80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/images-16.jpeg)
नवी दिल्ली | कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, घरातून बाहेर न पडल्यास घरात पैसे कसे येणार आणि पोट कसं भरणार? असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या गरिब, होतकरु कुटुंबांना सरकारने दिलासा दिला आहे.
केंद्र सरकारने देशातील 80 कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती 27 किलो रुपयांचे गहू अवघ्या 2 रुपयांना आणि प्रती किलो 34 रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त 3 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेतला. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. केंद्र सरकाने सर्व राज्य सरकारला तीन महिन्यांचा अॅडवान्स सामान खरेदी करण्याची सूचान दिली आहे, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीत कंत्राटी कामगारांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाला. या कंत्राटी कामगारांनाही संपूर्ण वेतन मिळणार असल्याची घोषणा प्रकाश जावडेकर यांनी केली. यावेळी प्रकाश जावडेकर यांनी जनतेला काळजी घेण्याचंदेखील आवाहन केलं.