breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळमध्ये ‘कोरोना’शी मुकाबला; आमदार सुनील शेळके आणि ‘टीम’ची सतर्कता!

मावळ | महाईन्यूज | प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजना करण्याबाबत आमदार सुनील शेळके यांनी ठिकठिकाणी पाहणी केली.

आमदार शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या, त्या प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना पहायला मिळाले. नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक म्हणून औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा त्यांची जबाबदारी उत्तम रितीने पार पाडत आहे. जीवाचा धोका पत्करुन प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलिस विभाग कर्तव्य बजावत आहे. त्या सर्वांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. काही सामाजिक संस्था, रा.स्व.संघाचे स्वयंसेवकही जनजागृती करीत आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती पाऊले उचलण्यात येत आहेत. नागरिकांनी रस्त्यावर गर्दी न करता घरातच थांबून रहायचे आहे. घरातुन बाहेर न पडणे हा एक सकारात्मक निर्धार आपण केला पाहिजे.
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. संचारबंदी असतानाही अनेक ठिकाणी नागरिक जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना भाजीपाला व इतर गोष्टी सहज उपलब्ध होतील अशी व्यवस्था करावी असे आदेश दिले होते.

प्रत्येक वार्डमध्ये भाजीविक्रीसाठी परवानगी…
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये भाजीविक्रेत्यांना परवानगी दिलेली आहे. परंतु गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी मास्कचा आणि सॅनिटायर्झचा वापर करावा. यासोबतच लोणावळा, देहुरोड येथील प्रशासनाला देखील योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी मुख्याधिकारी मा.दिपक झिंजाड, उद्योजक किशोरभाऊ आवारे, मा.नगराध्यक्ष राजेंद्र जाधव सर, उद्योजक संतोषभाऊ शेळके, नगरसेवक निखील भगत, नगरसेवक अनिल पवार उपस्थित होते. ‘मला विश्वास आहे मावळ तालुक्यातील जनता यापुढेही गांभीर्याने दक्षता घेईल’, असेही आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button