Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्रात आता कोरोनाचा तिसरा बळी, 68 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रात आता कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. मुंबईतील 68 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रुग्णालयात त्यांना 13 मार्चला दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला या रुग्णाचे रिपोर्ट्स पोजिटिव्ह आले होते मात्र नंतर निगेटिव्ह आल्याची रुग्णालयाने माहिती दिली. यानंतर रुग्णाला कस्तुरबा मधून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
रुग्णाला अस्थमा आणि अनेक आजारांनी हा रुग्ण ग्रासला असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचे दोन बळी आधीच गेले असताना तिसऱ्या मृत्यूने महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. मात्र या रुग्णांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह होते असा कस्तुरबा रुग्णालयाचा खुलासा केला आहे. आतापर्यंत संपूर्ण देशभरात कोरोनाच्या 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे





