Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘सूर्यवंशी’वर कोरोनाचं सावट,चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

Share On

24 मार्चला प्रदर्शित होणारा ‘सूर्यवंशी’ चित्रपट पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत.. मात्र सूर्यवंशी’ चित्रपटाच्यावरही कोरोनाचं सावट आलं आहे…चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता लांबणीवर गेली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारने कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट ठरलेल्या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. योग्य वेळी चित्रपट प्रदर्शित करु, असा उल्लेखही अक्कीने शेअर केलेल्या ट्विट पोस्टमध्ये केला आहे. २४ मार्चला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.  

अक्षय कुमारने यासंदर्भातील माहिती आपल्या चाहत्यांना देण्यासाठी ट्विटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे.

 ‘आम्ही वर्षभर मेहनत घेऊन तुमच्यासाठी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट तुमच्यासाठी तयार केला आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल ही झलक ट्रेलरला मिळत असलेल्या लोकप्रियतेतून दिसून येते. तुमच्या प्रमाणेच आम्हीही चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक आहोत. पण कोरोना विषाणूचे संकट पाहाता आमच्या टीमने चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. चाहत्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटीच हा निर्णय घेतला असून योग्य वेळी चित्रपट प्रदर्शित करु. असं अक्षयने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button