पुण्यातील आयटी कर्मचा-यांना ‘होम टू वर्क’चे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/2-16.jpg)
पुणे |महाईन्यूज|
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने राज्यातही आपला फैलाव सुरू केला आहे. कारण आता पुण्यात दोन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनाही नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या दोन्ही रुग्णांना करोना कक्षात देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान करोनाचे रुग्ण आढळल्याने शहरात चिंतेंचं वातावरण असून पूर्वकाळजी म्हणून आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यात आढळून आलेले करोनाचे दोन्ही रुग्ण दुबईला जाऊन आले होते. त्यांना नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे. एका रुग्णामध्ये करोनाची सौम्य लक्षणे दिसत असून दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळलेली नाहीत. रग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याची काही गरज नसल्याचे आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे.