निगडीत फायरब्रिगेडची पाईपलाईन करा, माजी उपमहापाैर शैलेजा मोरे यांची मागणी
महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, पक्षनेते नामदेव ढाके यांना दिले पत्र
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
निगडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फायरब्रिगेडची पाईपलाईन करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमहापाैर तथा नगरसेविका शैलेजा मोरे यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर व पक्षनेते नामदेव ढाके यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले की, निगडी येथील सर्व्हे नंबर 8/1 दुर्गामाता मंदिर परिसरात छोट्या-मोठ्या गल्लीत अचानक दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी अग्नीशामक गाड्या जाण्यास अडथळा येतो. त्यानूसार प्रभाग 15 मध्ये गुरुदेव नगर, पंचतारानगर, आकुर्डी गावठाण आदी परिसरात खुपच अडथळा आहे. भविष्यात त्याठिकाणी काही घडल्यास अग्नीशामक गाड्या पोहोचणे अशक्य आहे.
त्यामुळे निगडी परिसरात एक सर्वेअर नियुक्त करुन प्रभागाचा अभ्यास करुन अहवाल तयार करावा, त्यानूसार आमच्या प्रभागात फायरब्रिगेडची पाईपलाईन टाकण्यात यावी, तसेच संपुर्ण शहरात देखील फायर लाईन टाकून स्मार्ट सिटीत या प्रकल्पाचा समावेश करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.