Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri: विनयभंग केल्याच्या खोट्या तक्रारीवरून मायलेकास ठोठावली सक्तमजुरीची शिक्षा

पिंपरी | महाईऩ्यूज|

विनयभंग केल्याची खोटी तक्रार दिल्यानं तसेच साक्ष देणा-या महिलेला शिविगाळी करत तिला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पिंपरी न्यायालयाने एका माय-लेकास दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 9 महिन्यांची सक्त मजूरी आणि तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे.. पिंपरीचे न्यायाधीश डी.आर.पठान यांनी ही शिक्षा सुनावली आहे…स्वरुपा अनिलकुमार लोढा आणि दर्शन लोढा अशी मायलेकाची नावे आहेत…

चिंचवड गावात 28 सप्टेंबर 2013 ला एका दुकानासमोर पार्किंगवरून वाद झाला होता…त्या वेळी तक्रारदार संजय शेट्टी यांना स्वरुपा लोढा हिने शिवीगाळी करत विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती…याबाबत शेट्टी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती…तसेच आरोपी महिलेने या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळी करत जिवे मारण्याची धमकीही दिली होती…या प्रकरणाची सुनावनी पिंपरी न्यायालयात झाली…

दरम्यान सरकारी वकील साधना बोरकर यांनी साक्षीदार तपासले असता त्यांचे साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने दोघां मायलेकाला शिक्षा ठोठावली आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button