मुंबई अंधेरीतील औद्याेगिक वसाहतीत रोल्टा कंपनीच्या इमारतीला भीषण आग…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-87.png)
अंधेरी |महाईन्यूज |
मुंबईतील अंधेरी पूर्वमधील औद्यागिक वसाहतीतील रोल्टा कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास ही आग लागल्याचं समजतय.या आगीच कारण अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाहीये. या घटनेत एक महिला जखमी झाल्याचं समतंय…मात्र याव्यतिरिक्त किती लोक जखमी झालेत याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती हाती आलेली नाहीये…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/54s69nn8_rolta-fire_625x300_13_February_20.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/000-16.png)
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत. इमारतीमध्ये व्हेंटिलेशन नसल्याने अडीच ते तीन तासांपासून या आगीची तीव्रता वाढतच आहे. ३० पेक्षा अधिक अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत…जवानांना ही आग विझवणे अशक्य असल्यानं थर्मल इमेजिंग कॅमेरा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/jpg-1-1024x768.jpg)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा |