breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुलुंडमध्ये हाऊसिंग सोसायटीच्या लिफ्टने चिरडलं, एका व्यक्तीचा मृत्यू

मुंबई | महाईन्यूज

लिफ्टने चिरडल्यामुळे एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुलुंड पूर्वेला एका गृहनिर्माण सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर ही दुर्देवी घटना घडली. संजय यादव असे मृताचे नाव असून, ते लिफ्ट दुरुस्त करण्याचे काम करत होते. संजय टेक्निशिअन होते. लिफ्ट बनवणाऱ्या कंपनीमध्ये ते नोकरीला होते.

दुरुस्ती काम करत असताना, अचानक लिफ्ट सुरु झाली. त्यामुळे भिंतीलालागून काम करणाऱ्या संजय यांना लिफ्टने चिरडले. मुलुंड पूर्वेला न्यू पीएमजीपी सोसायटीमधील रहिवाशांनी लिफ्ट व्यवस्थित कार्य करत नसल्याची तक्रार केली होती. बिल्डरने व्यवस्थित काम केलेले नसल्यामुळे लिफ्ट सातव्या आणि १५ व्या मजल्यावर अचानक थांबायची असे रहिवाशांचे म्हणणे आहे. सोसायटीतील सदस्यांनी संजय यादव यांना प्रॉब्लेम समजावून सांगितला. त्यांनी लिफ्ट उघडून दुरुस्ती काम सुरु केले. त्यावेळी १३ व्या मजल्यावर कोणीतरी लिफ्टचे बटण दाबले. त्यामुळे लिफ्ट अचानक सुरु झाली व भिंतीला लागून काम करणाऱे संजय चिरडले गेले. त्यांना लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button