breaking-newsआंतरराष्टीय
हाफिझला पाकिस्तानातून अन्यत्र हलविण्याचा चीनने दिला सल्ला
बीजिंग : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिझ सईदला सुखाने जगावयाचे असेल तर त्याला पाकिस्तानमधून दुसऱ्या देशांत हलवा, असा सल्ला चीनने पाकिस्तानला दिला आहे. हाफिझ सध्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय संस्थांच्या निशाण्यावर आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची बोओ फोरममध्ये भेट झाली. त्यावेळी जिनपिंग यांनी सईदला पश्चिम आशियामध्ये हलविण्याचा सल्ला दिला होता.
एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, दोन्ही नेत्यांची सुमारे ३५ मिनिटे भेट झाली. त्यामध्ये काही वेळ हाफिझवर चर्चा झाली. चीनच्या सल्ल्यानंतर अब्बासी यांनी हाफिझबाबत वरिष्ठ कायदेतज्ज्ञांसमवेत चर्चा केल्याचे वृत्त आहे.