Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
पूरग्रस्तांचे कृष्णा नदीत उतरत जलसमाधी आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/18-1.jpg)
सांगली |महाईन्यूज|
पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी सांगलीत कृष्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले. सामाजिक संघटना आणि पूरग्रस्तांनी हे आंदोलन केले.
या आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने एका संतप्त पूरग्रस्त तरुणाने आंदोलना दरम्यान थेट नदीत उडी घेतली.
या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीत पाणी शिरल्यानं कुटुंबाच्या कुटुंब उध्वस्त झाली होती. ज्या नदीमुळे या शहराला महापुराचा फटका बसला त्याच कृष्णा नदी मध्ये उतरत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही केली.