मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा ; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Sambhaji-Brigade-1.jpg)
पुणे | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं निमित्त साधून मनसेनं आयोजित केलेल्या महाअधिवेशनात नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचं प्रतिनिधित्व करणारी ही राजमुद्रा रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. राजकीय पक्षानं तिचा वापर करणं चुकीचे आहे.
त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. तसं निवेदन पोलीस ठाण्यात दिलं आहे. मुंबईत मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे.
या अधिवेशनात राज ठाकरे यांनी पक्षाच्या नवीन झेंड्याचं अनावरण केलं. हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे. त्याच्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिण्यात आलं आहे. मात्र, मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्याला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे.
त्यांनी मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेविरोधात तक्रार केली आहे.
———————————————————————————————————
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा | ————————————————————————————————————