पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांना वाहिली श्रद्धांजली
दिल्ली | महाईन्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिलेली आहे. ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना करणाऱ्या नेताजींना मोदींनी खास पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत अभिवादन केलेलं आहे. सुभाष चंद्र बोस यांच्या वडिलांच्या डायरीचा उल्लेख मोदींनी केलेला आहे. ‘एका मुलाचा दुपारी जन्म झाला’ असं नेताजींचे वडिल जानकीनाथ बोस यांनी २३ जानेवारी १८९७मध्ये त्यांच्या डायरीत लिहिलं होतं. असं मोदींनी लिहिलं. हाच मुलगा भविष्यात स्वातंत्र्यसैनिक झाला आहे. ज्यानं त्याचं संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करताना आम्हाला गर्व होत आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.
मोदींनी एक व्हिडिओ दोखील ट्विट केलेला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेताजींच्या कार्याचा आणि बलिदानाचा उल्लेख करत देशातील प्रत्येक पिढीला ते प्रेरणा देत आहेत, असं म्हटलेलं आहे.