धक्कादायक! दिल्ली हैद्राबादनंतर मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Rape-1.jpg)
मुंबई | महाईन्यूज
देशभरातून महिनावर बलात्कारांच्या घटना समोर येत असताना आता मुंबईतही असाच धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मध्य प्रदेशच्या एक महिलेवर लोकमान्य तिळक टर्मिनसजवळ चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या चारही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता मुंबई सारखं शहरही माहिलांसाठी किंवा अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित नाही हे स्पष्ट होत आहे.
पीडित महिला ही काल रात्री ११ च्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकाहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे पायी निघाली होती. दरम्यान ती साबळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली. त्यावेळी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे झाडीच्या पलिकडे होते. लघुशंकेला बसत असलेल्या महिलेला त्यांनाही पाहिलं आणि आरोपींनी पीडितेला झाडांमध्ये ओढून नेलं. तिथे त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केला आहे. दरम्यानच्या यावेळी दुसरे आरोपी सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले हे दुचाकीवरून तिथूनच जात होते. महिलेचा आरडाओरडा ऐकून त्यांनी पीडित महिलेला मदत करण्याऐवजी त्या परिस्थितीचा फायदा उचलत पीडितेवर बलात्कार केला. यांनी या पीडित महिलेचे मंगळसूत्र आणि रोख ३००० रुपये घेऊनही आरोपी पळून गेले. मात्र या महिलेने तातडीने पोलिसांना फोन केला आणि घडलेला सगळं प्रकार सांगितला. पोलिसांनी लगेच आरोपींचा शोध घेतला. सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले या आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे.