डॉ. दाभोलकर हत्या प्रकणातील आरोपी विक्रम भावेचा जामीन फेटाळला
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुण्यातील उड्डाणपुलावर झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित गुन्हेगार विक्रम भावेचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला. दाभोलकर हत्या प्रकरणात रेकी केल्याचा विक्रम भावेवर आरोप आहे. विक्रम भावे याने जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला आहे. पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी होणार आहे.
विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना २६ मे रोजी अटक झाली. विक्रम भावे याच्यावर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप आहेत. या प्रकरणात संजीव पुनाळेकर यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुरावे नष्ट करणं, आरोपींना मार्गदर्शन करणं हे आरोप त्यांच्यावर आहेत.
विक्रम भावे हा ठाण्यातील गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे. दाभोलकर यांच्याबाबत सगळी माहिती त्याने रेकी करुन हल्लेखोरांना दिली होती. दरम्यान, याच विक्रम भावेने जामीन मिळण्यासाठी जो अर्ज केला होता, तो पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.