‘गांधीजींची पुन्हा हत्या होऊ देणार नाही’ – यशवंत सिन्हा

सीएए आणि एनआरसीच्या विरोधात गांधी यात्रेस सुरुवात
मुंबई – नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘गांधी शांती यात्रा’ यात्रेस सुरुवात केली. 3000 किमी. च्या या यात्रेस मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून सुरुवात झाली. यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही यात्रा राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा येथून जात 30 जानेवारीला दिल्लीच्या राजघाट येथे समाप्त होणार आहे.
यादरम्यान यशंवत सिन्हा हे म्हणाले की, आमची यात्रा एनआरसी आणि सीएएच्या विरोधात आहे. राज्य सरकारने हिंसाचार केला त्याविरोधात आहे. वाटेत आम्ही लोकांशी बोलू. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची सुरक्षा करून. देशाची पुन्हा फाळणी होऊ देणार नाही. गांधीजींची पुन्हा हत्या होऊ देणार नाही.
गांधी शांती यात्रेदरम्यान हे दोन्ही नेते सीएए, एनआरसी आणि जज लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दादेखील उचलणार आहेत. सोबतच, केंद्र सरकारकडे एनआरसी लागू न करण्याची मागणीही करणार आहेत. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील नेतेदेखील सामील झाले आहेत.




