Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
बाणेर येथील पॅनकार्ड क्लब इमारतीला आग ; इमारतीचे माेठे नुकसान

पुणे | महाईन्यूज
पुण्यातील बाणेर भागातील पॅनकार्ड क्लब या इमारतीला आज दुपारी 12.15 च्या सुमारास आग लागली आहे. या आगीत या इमारतीचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कुठलिही जीवित हानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या पाच फायर इंजिनच्या सहाय्याने आग आटाेक्यात आणण्यात यश आलेले आहे. या आगीत इमारतीचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12.15 च्या सुमारास बाणेर येथील पॅनकार्ड क्लब या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली व माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करत आग विझविण्याचे प्रयत्न केले. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलेले आहे. दरम्यान सध्या कुलींग ऑपरेशन करण्यात येत आहे.





