रितेश देशमुख आणि जेनेलियाचा शेतातला बेधुंद ,रोमॅण्टीक डान्स पाहिलात का?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/new1-1.png)
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांची लव्हस्टोरी जवळपास साऱ्यांनाच माहित आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि पाहता पाहता या मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं. २०१२ मध्ये या दोघांनी लग्न केलं. आता त्यांना दोन गोंडस मुलंदेखील आहेत. विशेष म्हणजे त्यांना एकत्र आणणाऱ्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला ३ जानेवारीला १७ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या चित्रपटातील एक गाणं रितेश-जेनेलियाने रिक्रिएट करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.
‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त साधत रितेश-जेनेलियाने लातूरमधील बाभूळगाव येथील एका शेतात बेधुंद होत रोमॅण्टीक अंदाजात डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ रितेशने ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे.
दरम्यान, ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन के. विजयभास्कर यांनी केलं असून निर्मिती रामोजी राव,ए.व्ही.राव यांची आहे.