शेतक-याची कमाल… अवघ्या सहा महिन्यात फक्त एकरभरात नऊ लाखांचं मिरचीच उत्पन्न.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/new-7.png)
सोलापूर | महाईऩ्यूज |
सोलापुरातील माळशिरस येथील मगर निमगावातील एका शेतकऱ्यांनं अवघ्या सहा महिन्यात फक्त एकरभरात नऊ लाखांचं उत्पन्न घेतलं आहे. त्या शेतकऱ्याचं नाव युवराज मगर असे आहे. मगर यांच्याकडे सात एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी ऊसाचे उत्पन्न न घेता डाळींब, मका, केळी आणि मिरचीची लागवड केली.
मगर यांनी जुलै महिन्यात एकरभर शेतीमध्ये मिरचीची लागवड केली. आतापर्यंत मगर यांना एकरभर मिर्चीसाठी ७०,००० रूपयांचा खर्च झाला. अवघ्या सहा महिन्यात यामधून त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळालं आहे. मगर यांनी आतापर्यंत एकरभरातून ३५ टन मिर्ची विकली असून अद्याप १५ टन मिर्ची निघेल असा अंदाच आहे. ३५ टन मिर्चीला प्रतिकिलो सरासरी २५ रूपयांचा भाव मिळाल्याने मगर यांना सात लाख रूपये मिळाले. शेततात असलेल्या १५ टन मिर्चीतून बाजारभावातून दोन लाख मिळतील असा अंदाज आहे.
युवराज मगर यांनी ऊसाच्या शेतीला दुष्काळात फटका बसल्याने आपल्या शेतात पीक बदल केला. त्यांनी आपल्या सात एकर जमिनीवर विविध पिके-भाज्या घेतल्या. एकरभर त्यांनी मिर्चीची लागवड केली. लागवड करताना नांगरणी करून रोटावेटर केलं. खते टाकल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरला. मगर यांनी एक एकरात अकरा हजार रोपे लावली आहेत. अमावस्या आणि पौर्णिमा वेळी अळी न होण्यासाठी फवारणी केली.