‘मंत्रिपद नसल्याने मन लागत नाही’; अजितदादांचा आणखी एक आमदार नाराज

पुणे | राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अनेक नेते नाराज झाले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांचाही समावेश आहे. मंत्रिपद न मिळाल्याने अधिवेशनात मन लागत नसल्याचे सांगत अण्णा बनसोडे यांनी मतदारसंघात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
अण्णा बनसोडे म्हणाले, की मला मंत्रिपद मिळेल अशी खूप अपेक्षा होती. मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलो आहे. त्यामुळे यावेळी दादा मला मंत्रिपद देतील असा विश्वास होता. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने थोडा भ्रमनिरास झाला आहे. तरीही अजित पवारांनी दिलेला शब्द ते नक्कीच पाळतील, असा मला विश्वास आहे.
हेही वाचा – ‘मुंबई महापालिकेवर सत्ता आणावीच लागेल अन्यथा..’; संजय राऊतांचं विधान
लोकांच्या कामांसाठी मी तातडीने मतदारसंघात आलो आहे. अजित पवार यांच्याशी बोलूनच मी हा निर्णय घेतला. घरी झालेल्या दुःखद घटनेमुळे अधिवेशन सोडावे लागले. तरीही जनतेच्या सेवेत मी अधिक जोमाने काम करणार आहे. यानंतर कदाचित माझ्या कामाचा विचार करेन, असंही अण्णा बनसोडे म्हणाले.





