Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एअर इंडियाकडून ईडी, सीबीआयची तिकीटे बंद

नवी दिल्ली | आर्थिक डबघाईला आलेल्या एअर इंडिया कंपनीने काळ्या यादीतील सरकारी कंपन्याना तिकीट देणे बंद केले आहे. ज्या कंपन्यांची थकबाकी 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्या सरकारी कंपनीतील अधिकाऱ्यांना यापुढे अधिकृतरित्या तिकीट दिले जाणार नाही. नुकंतच एअर इंडियाने याबाबतची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी एजन्सींची एअर इंडियाकडे 268 कोटी रुपयांची थकबाकी आहे. सरकार आणि इतर न्यूज एजन्सी कोणत्याही अधिकृत दौरे करण्यासाठी एअर इंडियाला प्राथमिकता देतात. मात्र जर एअर इंडियाची बुकिंग मिळाली नाही तर प्रायव्हेट एअरलाईन्समधून तिकीट खरेदी करुन दौऱ्यासाठी जातात. दरम्यान एअर इंडियाने पहिल्यांदा अशाप्रकारे सरकारी डिफॉल्टर्सची यादी जाहीर केली आहे. यामुळे या सर्व सरकारी कंपनीतील अधिकाऱ्यांनी पैसे चुकवल्यानंतर त्यांना तिकीट दिले जाणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button