राज्यातील गुन्हेगारीलाही स्थगिती द्या; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
![BJP Ashish Shelar criticises Shivsena over Gujrati Rally says...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ashish-shelar-udhav-thakare-Frame-copy.jpg)
महाईन्यूज | मुंबई
या पत्रात आशिष शेलारांनी म्हटलंय की, राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून १० दिवसांत अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत असून त्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील अस्थिरतेचा फायदा गुन्हेगारांनी उचलला नाही ना? तसेच सरकार स्थापन होऊन खाते वाटपही झालेले नाही. जबाबादाऱ्या निश्चित झाल्या नाहीत, त्यामुळे पोलीस यंत्रणेचे गुन्हेगारीकडे दुर्लक्ष तर झालेले नाही ना? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण व्हावेत असं चित्र सध्या राज्यात दिसते आहे असा आरोप करण्यात आलेला आहे.
नागपूर, ठाणे येथे अल्पवयीन मुलींवर बलात्कार, कल्याण, चेंबूर, वाकोला येथे खून, विरारमध्ये मारहाण, चुनाभट्टी येथे मुलीला गाडीखाली चिरडणे, एमडी ड्रग्सचा साठा जप्त करणे या अशा अनेक गंभीर घटना गेल्या १० दिवसात घडल्या आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचे बिघडलेले चित्र जनतेसमोर येत आहे. खून, चोरी, विनयभंग, बलात्कार अशा गंभीर स्वरुपातील घटनांमुळे लोकांमध्ये भीतीदायक वातावरण जनतेमध्ये निर्माण झाले आहे असं आशिष शेलारांनी सांगत तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केलेली आहे. तसेच ज्या तत्परतेने आणि जलदगतीने या सरकारने मागील शासनाने घेतलेल्या विकासकामांना स्थगिती देण्याचं काम केले आहे. त्याच तत्परतेने आणि जलदगतीने राज्यातील गुन्हेगारीला स्थगिती मिळविण्यासाठी काम करावं असा टोला भाजपा आमदार आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लावला आहे.