Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
भोसरीत राष्ट्रवादीचा ‘मास्टर प्लॅन’…माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191004-WA0176.jpg)
- माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा अपक्ष अर्ज
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
भोसरी विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार विलास लांडे यांना पुरस्कृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. साने अर्ज मागे घेतील आणि लांडे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहणार आहेत.
उमदेवारी अर्ज भरल्यानंतर शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि माजी नगरसेवक जालिंदर शिंदे असे मातब्बर नेते इच्छुक होते. त्यामुळे पक्षाच्या वतीने पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्ही विलास लांडे यांच्या नावाची घोषणा केली आहे.