breaking-newsपिंपरी / चिंचवड
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा
पिंपरी – विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अविनाश उर्फ अभय अरविंद कोकाटे, (वय-32, रा. संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रविंद्र कन्हेर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संत तुकारामनगर येथे आरोपी अविनाश कोकाटे यांनी 30 एप्रिल रोजी सायंकाळी साडे सात वाजता राहत्या घराबाहेर विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पुढील तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक घुगे करत आहेत.