breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भोसरी मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये आमदार महेश लांडगे ठरतील ‘हुकमी एक्का’

गावनिहाय मेळाव्यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

ठिकठिकाणी थाटात स्वागत अन्‌ दिमाखदार कार्यक्रमांची रेलचेल

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भोसरी विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या गावभेट दौऱ्याला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, समाविष्ट गावांमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती मिळत आहे. परिणामी, या निवडणुकीत समाविष्ट गावांमध्ये लांडगे हेच ‘हुकमी एक्का’ ठरतील, असे चित्र निर्माण झाले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य आणि आमदार महेश लांडगे यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आदी प्रमुख विरोधी पक्षांकडून उमेदवारी कुणाला मिळणार? याबाबत संभ्रम असताना आमदार लांडगे यांनी आपल्या प्रचारालाही सुरूवात केली. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात गावभेट दौ-याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येक गावातील मोक्याच्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमांना ग्रामस्थ, कायकर्ते आणि सर्वपक्षीय हितचिंतकांची उल्लेखनीय उपस्थिती दिसत आहे.

गेल्या चार दिवसांत चिखली, मोशी, दिघी आणि च-होली आदी गावांमध्ये मेळावा झाला.

चिखलीतील मेळाव्याला सुभाष मोरे, आनंदा यादव, पंडित मोरे, रोहिदास मोरे, भिमराव मोरे, सुनील लोखंडे, काळुराम यादव, दत्तूशेठ मळेकर, बाजीराव पाटील-मोरे, दत्तात्रय मोरे, किसनअप्पा यादव, काळुराम यादव, सदाशिव नेवाळे, दत्तात्रय तरटे, बाळासाहेब पवार, निलेश नेवाळे, विष्णुपंत नेवाळे आदी सर्वपक्षीय माननीय उपस्थित होते.

मोशी येथील कार्यक्रमाला माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, गणेश राठी, मनोहर बोऱ्हाडे, जितेंद्र कुरळे, भानुदास आल्हाट, चांगदेव बोराटे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.

चऱ्होली येथील सभेमध्ये  संजय पठारे, सुनील तापकीर, ज्ञानेश्वर रासकर, सावळाभाउ बुर्डे, चंद्रकांत तापकीर, बजरंग वाहिले, रोहिदास काकडे, प्रवीण काळजे आदींसह विविध पक्षांत काम केलेले आजी-माजी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

विदर्भ, खान्देश वासियांच्या स्नेहमेळावा उत्साहात …

विदर्श आणि खान्देश वासीयांच्या वतीने भोसरीत आमदार महेश लांडगे यांच्या समर्थनासाठी मेळावा आयोजित करण्यात आला. त्याला विदर्भ, खान्देशमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार लांडगे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे.

इंद्रायणीनगरनगरमध्ये महिलांची बाईक रॅली…

इंद्रायणीनगर येथील एका कार्यक्रमासाठी परिसरातील सोसायट्यांमध्ये वास्तव्य करणा-या महिला रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे बाईक रॅली काढून आमदार लांडगे यांचे स्वागत केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button