शिवसेना, युवासेना आयोजित ‘आयएएस’ स्पर्धा परीक्षेत श्रध्दा खैरे अव्वल
पिंपरी, (महाईन्यूज) – शिवसेना व युवासेना भोसरी विधानसभा आयोजित बाळासाहेब ठाकरे आयएएस स्पर्धा परिक्षेत संपूर्ण पुणे जिल्ह्यातून शिरुरमधील श्रद्धा खैरे अव्वल तर एकुण १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी आणि शिवउद्योग प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी, मोशी येथील गायत्री इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत एकुण ३८४ विद्यार्थी सहभागी झाले होते. संपुर्ण महाराष्ट्रातुन हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून शिरुरच्या श्रद्धा खैरे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. नवनाथ गुलधने, रनजित वाघमोडे, निलेश भोसले, कुंदन झिंगरे, शुभांगी वाळुंज, श्रीकांत चौधरी, प्रविण खाडे, मेघना गोरखा, तेजश्री सावंत, तेजस कवडे, प्रविण गुरव, प्रियांका वाळके, हर्षल सोनवणे, संदेश डाफळे हे १५ विद्यार्थी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून उत्तीर्ण झाले आहेत.
शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपनेते विजय कदम, संपर्कप्रमुख बाळा कदम, सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली. युवासेना जिल्हप्रमुख सुरज लांडगे, जिल्हा समन्वयक रुपेश कदम, युवासेना अधिकारी कुनाल जगनाडे, अमित शिंदे, विश्वनाथ टेमगिरे यांनी परीक्षा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.