उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी युवासेना पदाधिका-यांनी उचलली अनोखी जबाबदारी
पिंपरी, (महाईन्यूज) – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी युवासेनेच्या वतीने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वाचनालय फुगेवाडी येथे पाण्याचा कूलर भेट देऊन पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली.
तसेच, पिंपरी युवासेनेने नचिकेत अनाथ आश्रम येथील मुलांना खाऊ वाटप केला. आश्रमातील दोन विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक खर्चाची जवाबदारी युवासेनेच्या पदाधिका-यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. पिंपरी विधानसभेतील युवानेते प्रतिक्षा घुले आणि निलेश हाके यांनी विद्यार्थ्यांचा खर्च भागवण्याची जबाबदारी उचलली आहे.
याप्रसंगी युवा सेना जिल्हा सन्मवयक रुपेश कदम, युवती सेनाप्रमुख प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, विभाग संघटिका कामिनी मिश्रा,कल्पना जाधव, पुनम गिलबिले, मोहनापुरे, ॲड.अजित बोराडे, सनी कड, ओंकार जगदाळे आदी उपस्थित होते.