जन्मदात्या बापाची मुलानेच केली निर्घृण हत्या, अकोल्यातील धक्कादायक घटना
![Shocking! The body of an 89-year-old mother was found hidden in the house at a cost of Rs 43 lakh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/murder-crime.jpg)
जन्मदात्या बापाची मुलानेच डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्याच्या कानशिवणी गावात हा प्रकार घडला आहे. वडिलांची हत्या केल्यानंतर मुलगा घरातून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नामदेव राऊत (वय-65) असं मृत व्यक्तीचं नाव असून ते अल्पभूधार शेतकरी होते. शुक्रवारी रात्री ते घरासमोरील अंगणामध्ये झोपलेले असतानाच मुलगा चंदू राऊत(वय-40) याने त्यांच्यावर डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनेपूर्वी दोघांमध्ये आर्थिक बाबींवरुन शाब्दिक वाद झाल्याचे समजते. या वादातूनच वडिलांची हत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेची माहिती ठाणेदार हरीश गवळी यांना मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.