Breaking-newsपिंपरी / चिंचवड
संगीताच्या माध्यमातून मुलांच्या बौध्दिक क्षमतेत भर पडेल – तुषार कामठे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190720-WA0018.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – गीतांच्या माध्यमातून चांगले परिपाठ झाल्यास शाळेची सुरुवात दररोज चांगल्या प्रकारे होईल. संगीताच्या माध्यमातून मुलांच्या बौद्धिक क्षमतेत भर पडेल, असे गौरवोद्गार पिंपळे निलख प्रभागाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी काढले.
पिंपळे निलख येथील पिंपरी-चिंचवड मनपा शाळा क्रमांक 52 मध्ये आज दप्तरविना शाळा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक कामठे यांची उपस्थिती लाभली. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत गितमंच कार्यक्रम घेण्यात आला.
नगरसेवक कामठे म्हणाले, गाण्यांच्या माध्यमातून चांगले परिपाठ होतील. शाळेची सुरुवात रोज चांगल्या वातावरणात होईल. संगीताच्या माध्यमातून मुलांच्या बौद्धिक क्षमतेत नक्कीच भर पडेल. त्यामुळे नैतिक अधिष्ठान निर्माण होऊन सुसंस्कृत पिढी घडेल, अशा शब्दांत नगरसेवक कामठे यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.