रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मुंबई : रेल्वेच्या विविध कामांनिमित्त २१ जुलै रोजी मध्य रेल्वे मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाइंदर दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बवरील लोकल रद्द राहतील. तर अन्य मार्गावरील लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावणार आहेत. शनिवारी मध्यरात्री हार्बर माहीमजवळ धारावी उड्डाणपुलाच्या गर्डर कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
मध्य रेल्वे-मुख्य मार्ग
* कुठे- मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग
* कधी- स.११.१५ ते दु.३.४५ वा
परिणाम- ब्लॉकमुळे सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल सेवा दिवा ते परळ धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. परळनंतर पुन्हा जलद मार्गावर लोकल धावेल. सीएसएमटीतून सुटणाऱ्या जलद लोकल गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच धावेल. तर त्यानंतर दिवा स्थानकातूनच रत्नागिरीसाठी पॅसेंजर गाडी सुटेल. यासाठी दादर स्थानकातून दुपारी ३.४० वाजता विशेष लोकलही सोडण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे
* कुठे- बोरीवली ते भाइंदरदरम्यान अप व डाऊन धीमा मार्ग
* कधी- स.११.०० ते दु.३.०० वा
परिणाम-विरार, वसई रोड ते बोरीवली, गोरेगाव दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर धावतील. तर गोरेगाव ते वसई रोड, विरार दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर धावतील.
हार्बर रेल्वे
* कुठे- सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर
* कधी- अप मार्ग- स.११.१० ते दु.३.४० वा आणि डाऊन मार्ग-स.११.४० ते दु.४.१० वा
परिणाम- सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या अप व डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
शनिवारी ब्लॉक: शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे चापर्यंत माहीम स्थानकाजवळ धारावी गर्डरच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटीतून सुटणारी रात्री ११.३८ची अंधेरी लोकल आणि अंधेरीतून सीएसएमटीसाठी रात्री ११.५२ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.