भारतातून कॉफीची निर्यात घटण्याची चिन्हे; कॉफी बोर्डाचा अंदाज

तिरुअनंतपुरम् – कॉफी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ मध्ये भारत जवळपास ३१६,००० टन कॉफीचे उत्पादन घेणार आहे. हे प्रमाण मागील अंदाजापेक्षा १०% कमी आहे. कमी झालेला पाऊस आणि वाढलेले तापमान यामुळे पिकाला फटका बसला आहे.
सध्याच्या विपणन हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) भारत रोबुस्टा प्रजातीच्या कॉफीचे जवळपास २२१,००० टन उत्पादन घेणार आहे. हे प्रमाण मागील अंदाजापेक्षा १०% कमी आहे. तर अरॅबिका चे उत्पादन देखील जवळपास ८ टक्के घटून ९५,००० टन होण्याचा अंदाज आहे.
असे म्हटले जाते की, भारताने कॉफीचे उत्पादन घेणे सन १६७० मध्ये सुरू केले. यासाठी गैरमार्गाने आणलेल्या ७ बियांचा उपयोग करण्यात आला होता. आता हा देश एकूण उत्पादनाच्या तीन चतुर्थांश निर्यात करतो. इटली, जर्मनी आणि बेल्जियम हे भारतीय कॉफीचे प्रमुख खरेदीदार आहेत. यासाठी ते जागतिक बाजाराच्या तुलनेत अधिक किंमत मोजतात.





