मायावतींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/mayavati-.jpg)
लखनौ – कर्नाटकात झालेल्या पराभवानंतर आता विरोधी पक्षांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल सुरू केला आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी कर्नाटकातील पराभवासाठी कॉंग्रेसला जबाबदार धरत त्या पक्षावर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकातील आपल्या प्रत्येक सभेत राहुल गांधी यांनी देवेगौडा यांच्या जनता दलाला भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हटले होते. त्यामुळेच मतांची विभागणी झाली त्याचा फायदा भाजपला झाला, असा दावा मायावती यांनी केला आहे.
लखनौ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मायावती यांनी भाजपलाही लक्ष्य केले. हा पक्षात केंद्रात सत्तेवर आल्यापासून सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग केला जात असून बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येडियुरप्पा यांना राज्याचा मुख्यंमंत्री करण्याची कृती हा लोकशाहीवरील हल्ल्याच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.