Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
आज मध्य रेल्वे रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/central-railway-1.jpg)
बुधवारी मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर कमी लोकल धावणार असून उद्याचे वेळापत्रक रविवारच्या वेळापत्रकानुसार असणार आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मध्य रेल्वेने हा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सीपीआरओ सुनील उदासी यांनी दिली आहे.
मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल गेल्या तीन ते चार दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे स्लो झाली होती. अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.