TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिव्यांगासाठी सातवे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर उत्साहात संपन्न

सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर

पिंपरी / चिंचवड | सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी श्री.लक्ष्मीबाई बारणे उद्यानातील्, वाकड येथे विशेष (दिव्यांग) मुलांकरीता सातवे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराची सुरुवात 12 ऑगस्ट २०२१ पासून केली या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांगांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार व लाभ सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे.या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात.या शिबिरात विशेष (दिव्यांग) मुलांच्या मोफत आरोग्य तपासणीसह औषधे देण्यात आली. शिबिरामध्ये अनेकांनी लाभ घेतला आहे.

     सदर शिबिर होमिओपॅथीचे जनक डॉ.सम्युयल हनिमन्न यांच्या प्रेरणेने तसेच कै.डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ   आयोजित केले जाते. कै.डॉ.प्रफुल्ल विजयकर सर यांनी 2005 साली सेवा भावातून विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली. आज पर्यंत विजयकर सरांमुळे हजारो विशेष मुलांना निस्वार्थ भावनेतून शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार घेता आले आहेत.परंतु त्यांच्यानंतरही प्रेडीक्टीव होमिओपॅथीचे विद्यमान संचालक डॉ अंबरीश विजयकर सर व तरंग विजयकर सर यांनी हि सेवा अविरतपणे चालु ठेवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

    सप्तर्षी फाउंडेशनने गेले अनेक वर्षे दिव्यांगा सोबत काम करत आहे, त्यासोबतच संस्थेच्या विविध सामाजिक क्षेत्रातील कामगिरी खालील प्रमाणे आहे.सप्तर्षी समग्र दिव्यांग सेवा प्रकल्प व मोफत.बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार,शीतऋतू मध्ये गरजू व्यक्तींना मोफत चादर वाटप,दुष्काळग्रस्त भागात जलसंधारण कार्य,गरजू,होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत इत्यादी.

       शिबिराचे उद्घाटन प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे डॉ.रजत मालोकार साहेब, संस्थेचे संस्थापक सचिव श्री.मनोजकुमार बोरसे , सनदी लेखापाल व लेखक अरविंद भोसले,उद्योजक विशाल मासुळकर,समाजसेविका विजया माने-सपकाळ,समूह्संघटिका वैशालीताई लगडे,समाजसेवक यशपाल खोब्रागडे,चित्रपट दिग्दर्शक तथा लेखक किरण जाधव या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सप्तर्षी फाउंडेशन सतत करत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्यासाठी सप्तर्षी फाउंडेशन ला प्रोत्साहन दिले व पुढील कार्याकरिता सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी ला  शुभेच्छा दिल्या.  तसेच सप्तर्षी फाउंडेशन ला सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली.

    या शिबिरात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी तर्फे मुख्य समुपदेशक डॉ. रजत मालोकार, डॉ. आसमा एम , डॉ.निवेदिता हांचे ,डॉ. रुचिता भूरट , डॉ. प्रियांका धुमाळ, डॉ. रोहित देशमुख ,डॉ. दिपाली साळुंखे,डॉ.रेणुका बर्बिंड तसेच सहायक डॉ  स्नेहा पंडित,गुफरान काझी, हनी ओस्वाल, तुषार चौगले,डॉ.सबीरा मुकादम डॉ.शिवानी पाल डॉ.सिमरन जाधव डॉ ऋशिकेश दगडे, सौम्या चतुर्वेदी,धवल शर्मा शिव प्रतापसिंग,हर्षिता दीप,डॉ.आश्लेषा देशमुख,इत्यादी डॉक्टर उपस्थित होते.

     सप्तर्षी फाउंडेशन चे संस्थापक सचिव श्री.मनोजकुमार बोरसे, सौ.रूशाली बोरसे तसेच साहेबराव एन.डोंगरे व अनुराग कांबळे  संस्थेच्या वतीने उपस्थीत होते. सदर कार्यक्रमास माजी पोलीस अधिकारी श्री विश्वास पवार,  सौ.चंद्रिका सुतार, कु.साक्षी भाट कु.हर्षल सुरुशे इत्यादी स्वयंसेवकांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला.

     संस्थेचे संकल्प आणि प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.वैशालीताई मुळे, सचिव श्री. श्रीकांत चव्हाण व सदस्य श्री. वरून सावरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होते. त्याबद्दल श्री मनोज बोरसे यांनी त्यांचेही आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button