breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यात कोरोनाचे ७० नवे रुग्ण, पुण्यात JN.1 व्हेरियंटचे १५ रुग्ण

पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात ७० नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात एकूण ७३१ सक्रिय रूग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे ठाण्यात आहेत. नव्या आलेल्या JN.1 व्हेरिएंटचे 29 रुग्ण आहेत. यापैकी १५ रुग्ण हे पुण्यातील आहेत.

१ जानेवारी रोजी राज्यात ७० नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळून आले आहेत. नवी मुंबईत १८, पुणे मनपा क्षेत्रात १६, ठाणे मनपा क्षेत्रात १५, मुंबई मनपा क्षेत्रात १४, नागपूर मनपा क्षेत्रात ११, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७, पुण्यात ६, पिंपरी चिंचवडमध्ये ५, छत्रपती संभाजीनगर मनपा क्षेत्रात 4, सांगलीत 3, साताऱ्यात ३ रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा   –  वाहतूक व्यवस्था ठप्प, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा; नेमकं काय आहे कारण?

सध्या राज्यात एकूण ७३१ सक्रिय रूग्ण आहेत. ठाण्यात एकूण २१२ सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईत १३० सक्रिय रूग्ण आहेत. पुण्यात १२४ तर नागपुरात ५० सक्रिय रूग्ण आहेत. सिंधुदुर्गात २, अहमदनगरमध्ये ३, भंडारा ३, अकोल्यात ३, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५०, रायगडमध्ये ३१, सांगलीत १८, साताऱ्यात १७, बीडमध्ये १२, नाशिकमध्ये १४, अमरावतीत १३, सोलापुरात ९, कोल्हापुरात ९, रत्नागिरीत ५, नांदेडमध्ये ५, जळगावात ५, धाराशिव ४, हिंगोलीत ४ सक्रिय रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button