breaking-newsताज्या घडामोडीपुणे

68 लाखांचा स्टॅम्प पेपर घोटाळा, बनावट शिक्के मारुन चाललेला काळाबाजार उघड

महाईन्यूज अपडेट

शहरातील कोषागार कार्यालयातून विनाशिक्क्यांशिवाय स्टॅम्प पेपरची खरेदी करून त्यावर बनावट शिक्का मारून स्टॅम्पचा काळाबाजार करणाऱ्या तिघांच्या कुटुंबीयांना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 68 लाख 38 हजार रुपये किमतीचे 500 आणि 1000 रुपयांचे तब्बल 11 हजार 700 स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले आहेत.

चिन्मय सुहास देशपांडे ( 26), सुहास मोरेश्वर देशपांडे ( 59) व सुचेता सुहास देशपांडे ( 45, तिघेही रा. कसबा पेठ, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय विश्वनाथ जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाड्यालगत असलेल्या एका इमारतीत बनावट सही व शिक्क्याचा वापर करून स्टॅम्प पेपरचा काळाबाजार होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कलगुटकर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी लाल महालशेजारील ‘कमला कोर्ट’ इमारतीसह शनिवार पेठेतील ‘पार्वतीमाता’ सोसायटीतील घरावर छापा टाकला. त्या ठिकाणी देशपांडे कुटुंबीयांनी स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण करण्याच्या उद्देशाने विनाशिक्क्यांचे खरेदी केलेले 68 लाख 38 हजारांचे स्टॅम्प सापडले. अधिक चौकशीत त्यांनी कोषागार कार्यालयातून अधीक्षकांच्या विनाशिक्क्यांशिवाय स्टॅम्प पेपरची खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर ‘वरिष्ठ कोषागार अधिकारी, प्रथम मुद्रांक लिपिक कोषागार’ असा बनावट शिक्का तयार करून स्टॅम्प पेपरवर उमटवून सही करीत नागरिकांना विक्री केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कमला कोर्ट इमारतीसह पार्वतीमाता सोसायटीतून 500 व 1000 रुपयांचे 68 लाख 37 हजार रुपये किमतीचे 11 हजार 700 स्टॅम्प पेपर जप्त केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस तपास करीत आहेत.

कृत्रिम तुटवड्याचा उद्देश

कोषागार कार्यालयातून जादा स्टॅम्प पेपरची खरेदी करून शहरात स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न देशपांडे कुटुंबीयांनी केला. त्यानंतर जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री करून अतिरिक्त रक्कम कमविण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासावरून सांगितले.

कोण आहे ‘तो’ कोषागारातील कर्मचारी?
कोषागारातून विनाशिक्क्याशिवाय स्टॅम्प पेपर देशपांडे कुटुंबीयांच्या ताब्यात देणारा कर्मचारी कोण? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. किती वर्षांपासून व शहरातील कोणकोणत्या स्टॅम्प व्हेंडर्सना विनाशिक्क्यांच्या स्टॅम्प पेपरचा ताबा दिला आहे, याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार ठराविक व्हेंडर्सना जादा स्टॅम्प पेपर विक्रीसाठी उपलब्ध करून शहरात कृत्रिम स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण करणारी साखळी कार्यरत आहे काय? याची चौकशी केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button