breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड- ताथवडे-पूनावळे प्रभागातून ५ हजाराचे लीड देणार: ज्येष्ठ शिवसैनिक तारामल कलाटे

पिंपरी: भारतीय जनता पक्षाच्या कुटनीतीमुळे शिवसैनिक प्रचंड दुखावला आहे. खोके सरकारच्या मदतीने शिवसैनिकात फूट पाडणाऱ्या भाजपचा चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वचपा काढण्याची संधी चालून आली आहे. यावेळी आमचा पक्ष हा महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आहिज मत वाकड येथील ज्येष्ठ शिवसैनिक तारामल कलाटे (आण्णा) यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे पुनावळे, ताथवडे आणि आमच्या हक्काच्या वाकड परिसरातून महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना ५ हजारापेक्षा जास्त मताचे लीड देणार असेही कलाटे यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती स्व. नगरसेवक आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची होती. यावेळी चिंचवडची निवडणूक ही भावनिकतेवर नव्हे तर विकासकामांच्या जोरावर जिंकू, असा विश्वासही रोहित पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

भ्रष्ट कारभाराला कंटाळून भाजपच्या चिंचवड विधानसभेतील तीन विद्यमान आणि एक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे चिंचवड विधानसभेत खळबळ निर्माण झाली असून भाजप बॅकफूटवर गेला आहे. भाजपला साथ देणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रचाराला आणि मतदानाला बोलावणाऱ्या स्वार्थी आणि भ्रष्ट भाजप नेत्यांनीच भावनेचा बाजार मांडल्याने मत तारामल कलाटे (अण्णा) यांनी पुनावळे येथील कोपरा सभेवेळी दिले.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, स्व. नगरसेवक आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, मयूर कलाटे, रेखा दर्शीले, संदीप पवार, सुप्रिया पवार, विजय दर्शिले, माजी सरपंच लक्ष्मण मोहिते, संभाजी शिंदे, सागर ओव्हाळ, राजाराम काटे, प्रकाश काटे, सुरेश रानवडे, किरण बोरगे, सुभाष कोयते, शिवाजी बांदल, अतुल काटे, सचिन झिंजुर्डे, राहुल काटे, ईश्वर ओव्हाळ, राजेंद्र गायकवाड, शांताराम बोडके, बाळासाहेब बोडके, अक्षय भुजबळ, श्रीकांत ढवळे, सुनील ढवळे यांच्यासह पुनावळेतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

पुनावळे येथील बुद्ध विहार, बोरगेवाडा, भैरवनाथ मंदिर, पुणे शहर सावता माळी मंदिर ते मोहिते कॉम्प्लेक्स पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर कोयतेवस्ती, पांढरे वस्ती, काटे वस्ती, ताजणे वस्ती, विजयनगर, माळवाडी या परिसरात रॅली काढून शिवसेनेच्या नगरसेविका रेखा दर्शीले यांच्या निवासस्थानी जनतेशी संवाद साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button