breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

१ एप्रिलपासून होणार ५ महत्वाचे बदल, तुमच्या खिशाला कात्री लागणार?

1 April | १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक नियमांमध्येही बदल होणार आहेत. १ एप्रिलपासून पैशाच्या संबंधित महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. यामध्ये क्रेडिट कार्डच्या नियमांपासून ते NPS नियमांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

NPS साठी नवीन नियम

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) NPS गुंतवणूकदारांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी द्विस्तरीय सुरक्षा प्रणाली लागू करणार आहे. या अंतर्गत टू वे ऑथेंटिकेशन आधारित प्रमाणीकरण सुरू केले जाईल. हे सर्व पासवर्ड-आधारित वापरकर्त्यांसाठी अनिवार्य असेल. नवीन नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे.

SBI क्रेडिट कार्डमध्ये बदल

SBI कार्डने जाहीर केले आहे की काही विशिष्ट क्रेडिट कार्डांद्वारे भाडे देयांवर रिवॉर्ड पॉइंट्स १ एप्रिल २०२४ पासून बंद होतील. यामध्ये AURUM, SBI Card Elite, SBI Card Elite Advantage, SBI कार्ड पल्स यांचा समावेश आहे. त्याच वेळी काही क्रेडिट कार्डांवर भाड्याच्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट मिळणे १५ एप्रिल २०२४ पासून बंद होईल.

हेही वाचा    –    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट अन् मुळीक लागले मोहोळांच्या प्रचाराला!

OLA मनी वॉलेट

१ एप्रिल २०२४ पासून OLA मनी वॉलेटकडून प्रति महिना १०,००० रुपयांच्या कमाल वॉलेट मर्यादेसह लहान PPI (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट) वॉलेट सेवा सुरू करण्यात येणार आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून याची माहिती दिली आहे.

ICICI बँक लाउंज अॅक्सेस

ICICI बँकेने कॉम्प्लिमेंट्री एयरपोर्टच्या लाउंज अॅक्सेस अटींमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तिमाहीत ग्राहकांना यासाठी किमान ३५,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. यानंतरच पुढील तिमाहीसाठी कॉम्प्लिमेंट्री एयरपोर्टच्या लाउंज अॅक्सेस अनलॉक होईल.

Yes बँक लाउंज एक्सेस बेनिफिट्स

Yes बँकेने नवीन आर्थिक वर्षापासून आपल्या देशांतर्गत लाउंज एक्सेस बेनिफिट्स धोरणांमध्ये बदल केले आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, पुढील तिमाहीत सर्व ग्राहकांना लाउंज एक्सेस बेनिफिट्स मिळविण्यासाठी चालू तिमाहीत किमान १०,००० रुपये खर्च करावे लागतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button