breaking-newsआंतरराष्टीय

5 हजार रुपयांच्या मोबदल्यात पाकसाठी हेरगिरी, व्हॉट्सअॅपद्वारे द्यायचा माहिती

राजस्थानमधील जैसलमेर येथे पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जीप चालकाला अटक केली आहे. नवाब खान असे या चालकाचे नाव असून तो व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉलवर सांकेतिक भाषांचा वापर करुन पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला माहिती द्यायचा.

जैसलमेरमध्ये भारत- पाकिस्तान सीमेजवळील सम या भागात नवाब खान (वय 36) हा जीपचा चालक म्हणून काम करायचा. जयपूरवरुन येणाऱ्या पर्यटकांना परिसरात फिरवण्याचे काम तो करायचा. गेल्या वर्षी नवाब हा पाकिस्तानमध्ये गेला होता. तिथे तो आयएसआयच्या संपर्कात आला. आयएसआयने त्याला प्रशिक्षण दिले आणि तिथून भारतात परतल्यावर तो सीमाभागात भारतीय सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवू लागला. जैसलमैरमध्ये पाकिस्तानी हेर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या काही महिन्यांपासून नवाब खानच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती. नवाब हेरगिरी करत असल्याचे खात्रीलायक पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. नवाब खानच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

भारतीय सैन्याच्या हालचालींवर आणि कारवायांवर नजर ठेवण्याचे काम तो करायचा. सैन्यासंबंधीची सर्व माहिती तो व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉलवरुन आयएसआयला द्यायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. नवाब खानचा एक नातेवाईक पाकमध्ये राहतो. तो देखील आयएसआयचा एजंट असल्याचे सांगितले जाते. त्याच्यामुळे नवाब आयएसआयच्या संपर्कात आला होता. नवाब खानला एका माहितीसाठी पाच हजार रुपये मिळायचे. नवाब खानने महिनाभर पाकमध्ये प्रशिक्षण घेतले होते, असे पोलीस दलातील सूत्रांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button