राष्ट्रिय
दंगल भडकल्याप्रकरणी हार्दिक पटेल यांना दोन वर्षाची शिक्षा

अहमदाबाद – 2015 साली पेटलेल्या पटेल आंदोलनादरम्यान भाजपा आमदार हृषिकेष पटेल यांच्या कार्यालयाची मोडतोड केल्याप्रकरणी न्यायालयाने पाटीदार नेता हार्दिक पटेल याला दोषी ठरवले असून, त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पटेल समुदायाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 2015 साली गुजरातमध्ये आंदोलन पेटले होते. या आंदोलनाला कालांतराने हिंसक वळण लागले होते. त्यावेळी भाजपा आमदार हृषिकेश पटेल यांच्या विसनगर येथील कार्यालयाची मोडतोड करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर आज निकाल देताना विसनगर येथील न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.