ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

21वी प्रसुती ऊसाच्या फडात, बीडमधील लंकाबाईच्या नवजात मुलीचा मृत्यू!

बीड | महाईन्यूज |

माजलगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केसापुरी कॅम्प परिसरात मालोजी देवीदास खरात हे पाल ठोकून मागील 12 ते 15 वर्षापासून वास्तव्यास आहेत. मालोजी यांची पत्नी लंकाबाई ही एकविसाव्या वेळेस गरोदर असल्याचा प्रकार समोर आला होता.एकविसाव्या वेळी प्रसुती झालेल्या बीडमधील लंकाबाईंच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे. लंकाबाई यांनी ऊसाच्या फडात मुलीला जन्म दिला होता. लंकबाईंची यापूर्वी नऊ अपत्ये दगावली आहेत. वयाच्या चाळीशीमध्येच लंकाबाईंची आतापर्यंत एकवीस वेळा प्रसुती झाली आहे.

यापूर्वी वीस वेळा प्रसुती झालेल्या लंकाबाई एकविसाव्या वेळी गर्भवती राहिल्या. या खेपेला त्यांची प्रसुती झाली, मात्र जन्मलेल्या नवजात मुलीचा मृत्यू झाला. लंकाबाई ऊस तोडणीच्या कामासाठी कर्नाटकमध्ये गेल्या होत्या, तिथेच ऊसाच्या फडात त्यांची एकविसाव्या वेळी प्रसुती झाली.

त्यांची सध्या नऊ मुली आणि दोन मुले सध्या जिवंत आहेत. तर नऊ अपत्ये बाळंतपणानंतर दगावली. आतापर्यंत त्या कधीच शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात बाळांतपणासाठी दाखल झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे लंकाबाईची आशा स्वयंसेविकेने रजिस्टर नोंद घेतली. मात्र त्यानंतरच्या कोणत्याही वैद्यकीय सुविधा लंकाबाईला मिळाल्या नाहीत.

दरम्यान आरोग्य यंत्रणेने त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र दोन दिवस उपचार घेऊन लंकाबाईंनी जिल्हा रुग्णालयातून पळ काढला होता. त्यामुळे लंकाबाईंना उपचार देण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा सुद्धा तोकडी पडली होती. गेल्यावर्षीच एक मुलगा होऊन वारला आणि आता लगेच गरोदर. सहामायी पाळणा म्हणजे 18 महिन्यात दोनदा बाळ . लंकाबाईच्या चार मुली आणि एका मुलाचा विवाह झालेला आहे. त्यांनीही 3, 4 आणि 5 एवढी अपत्य जन्माला घातली आहेत. यासर्व घटनांवरून तब्येची होणारी हेळसांड आणि धोका हे न समजनं म्हणजे निव्वळ शरिराशी एकप्रकारे खेळ करून मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button