‘हिटमॅन इज बॅक’! आयपीएल २०२७ साठी रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार

Rohit Sharma MI Captain | आयपीएल २०२७ हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण असणार, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. मुंबई इंडियन्सने ऐतिहासिक निर्णय घेत ‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेल्या रोहित शर्माकडे पुन्हा एकदा संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक खास आणि कमालीचा व्हिडिओ शेअर करत रोहित शर्माच्या कर्णधारपदाची अधिकृत घोषणा केली आहे.
आयपीएल २०२६ च्या हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. या हंगामात संघाने १४ पैकी तब्बल १० सामने गमावले होते आणि गुणतालिकेत नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यामुळे मुंबई इंडियन्सचा आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ सहा वर्षांपर्यंत लांबला होता. परिणामी कर्णधार बदलण्याची मागणी जोर धरत होती. नुकतेच मुंबईने हार्दिक पंड्याला पंजाब किंग्ससोबत ट्रेड ऑफ करत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संघात सामील करून घेतले, ज्यामुळे नव्या कर्णधाराचा मार्ग मोकळा झाला.
हेही वाचा
६ लाखांचे टेबल, ७ लाखांची लिफ्ट अन् ५.८ लाखांचे वॉश बेसिन! केजरीवाल यांचा ‘शीशमहल’ लोकांसाठी खुला
The story 𝗼𝗳 𝗖𝗮𝗽𝘁𝗮𝗶𝗻 𝗥𝗼𝗵𝗶𝘁 𝗦𝗵𝗮𝗿𝗺𝗮 is far from over 💙
The 5️⃣-time title-winning skipper is back at the helm for @mipaltan for #TATAIPL 2027 🫡
@ImRo45 https://t.co/tMeaaXVyU2
— IndianPremierLeague (@IPL) November 27, 2026
कर्णधारपदाच्या शर्यतीत संघातील अनुभवी खेळाडू सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावांची चर्चा होती. याशिवाय, भविष्यातील संघबांधणी लक्षात घेता युवा फलंदाज तिलक वर्माचाही विचार होऊ शकत होता. मात्र, सर्व पर्याय बाजूला ठेवून व्यवस्थापनाने पुन्हा एकदा रोहित शर्माच्या अनुभवावर विश्वास दाखवला आहे.
रोहित शर्माचा मुंबई इंडियन्ससोबतचा सुवर्ण प्रवास
२०११ मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून रोहित शर्मा संघाच्या अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल पाच आयपीएल विजेतेपदे पटकावली आहेत. युवा खेळाडूंवरील विश्वास, शांत नेतृत्व आणि मुंबईच्या चाहत्यांशी असलेले घट्ट नाते यामुळे रोहित पुन्हा कर्णधार झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




