ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खेड तालुक्यातील गोरेगाव, धामणगावांत २०० मदत किटचे वाटप

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

भाजपा नगरसेविका कविता भोंगाळे पाटील यांचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गोरेगाव आणि धामणगाव येथील गरजू कुटुंबांना नगरसेविका कविता भोंगाळे पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या एकूण २०० किटचे वाटप केले. भाजपा नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत हे वाटप करण्यात आले.

दैनंदिन वापरासाठी आवश्यक वस्तू उपलब्ध करून देऊन गरजू कुटुंबांच्या घरखर्चाला हातभार लावणे हा या वाटपाचा उद्देश होता. त्यासाठी भोंगाळे पाटील यांनी गोरेगाव आणि धामणगाव येथे प्रत्यक्ष जाऊन कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य दिले.

हेही वाचा

‘वायसीएम’च्या औषधपुरवठ्यावर दरवर्षी श्वेतपत्रिका काढा, महापौर रवि लांडगे यांचे आदेश

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील ५१ आदिवासी गावांमधील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला आहे. आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक, हार-तुरे आणि सत्कारांवर होणारा खर्च गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी वळवण्याच्या संकल्पनेतून ही मोहीम हाती घेण्यात आली. गोरेगाव आणि धामणगावातील किटवाटप त्याचाच भाग आहे.

“महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त गोरेगाव आणि धामणगावातील कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याचा निर्णय घेतला. गरजू कुटुंबांना त्यांच्या गावातच मदत मिळावी, यासाठी आम्ही दोन्ही गावांत जाऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. अडचणीच्या काळात या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे, ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे.”

– कविता भोंगाळे पाटील, नगरसेविका, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group