Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

रायगड किल्ल्याच्या विकासकामांना मिळणार गती! भरत गोगावले यांचे कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश

रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकास आराखड्याच्या ३१ व्या बैठकीत संवर्धन, स्वच्छता, शिवसृष्टी आणि रोपवे प्रस्तावांचा आढावा

रायगड-अलिबाग : रायगड किल्ला आणि परिसराच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सुरू असलेली संवर्धन व विकासकामे नियोजनबद्ध पद्धतीने आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकास आराखडा प्राधिकरण समितीच्या ३१ व्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, श्री. देशमुख, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रवींद्र शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलिबाग येथील कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विकासकामांचा घेतला आढावा

बैठकीत पालकमंत्री गोगावले यांनी रायगड किल्ला परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने मंजूर केलेल्या कामांची सद्यस्थिती, सी-डॅक अंतर्गत सुरू असलेली कामे, एमआरएसएसीच्या पुढील टप्प्यातील कामे तसेच स्वच्छतागृहांचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे हस्तांतरण या विषयांवर चर्चा करण्यात आली.

प्रलंबित कामांसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून पुढील कार्यवाही निश्चित करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

हेही वाचा –  जपानला ४-१ ने नमवत भारताचा ऐतिहासिक विजय! सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा

रायगड किल्ला प्लास्टिकमुक्त आणि कचरामुक्त करण्यावर भर

रायगड किल्ला परिसर प्लास्टिकमुक्त आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. कचरा संकलन आणि विल्हेवाटीची योग्य व्यवस्था करण्यासोबतच पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला.

याशिवाय होळीचा माळ छत्री येथील कामे, पाणीटंचाईवर मात करण्यासाठीच्या पूर्वनियोजित उपाययोजना, शिवसृष्टी प्रकल्पाची सद्यस्थिती तसेच साहित्य रोपवे आणि प्रवासी रोपवेच्या प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला.

ऐतिहासिक दस्तऐवजांच्या जतनासाठी स्वतंत्र कक्षाची चर्चा

रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि विकासकामांशी संबंधित छायाचित्रे, नकाशे आणि तांत्रिक रेखाचित्रे यांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन करण्यासाठी स्वतंत्र अभिलेख व दस्तऐवजीकरण कक्ष स्थापन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

किल्ला संवर्धन आणि विकासकामांची प्रगती संबंधित विभागांनी नियमितपणे तपासावी. तसेच परस्पर समन्वय ठेवून प्रलंबित बाबींचा वेळेत निपटारा करावा, असे निर्देश पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group