Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘कॉक्रोच जनता पार्टी’ला अमेरिका अन् पाकिस्तानमधून फंडिंग; केंद्रीय मंत्र्यांच्या दाव्यावर CJP चे जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली | ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला (CJP) अमेरिका आणि पाकिस्तानमधून आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे. या आरोपांवरून आता विरोधी पक्ष, CJP आणि सत्ताधारी भाजप यांच्यात जोरदार राजकीय जुंपली आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांना अमेरिकेतून आणि सह-संस्थापक आशुतोष रांका यांना पाकिस्तानातील राजकीय नेत्यांकडून आर्थिक मदत मिळत असल्याचा दावा करत, या पैशांचा वापर भारताविरोधी मोहीम राबवण्यासाठी आणि सरकारविरोधात खोटे नरेटिव्ह तयार करण्यासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र सिंह यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, “देशविरोधी शक्ती, परकीय देणग्यांवर चालणाऱ्या एनजीओ आणि अराजकवादी घटक एकत्र येऊन देशात खोटी माहिती पसरवण्याचे सुनियोजित कारस्थान रचत आहेत. अशा अराजकवादी घटकांना अवैध मार्गाने पैसा पुरवला जात असल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणांकडे आहेत.” राजकीय चिखलफेक करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या निधीचे स्रोत जाहीर करावेत, असे आव्हान देत त्यांनी परकीय योगदान नियमन कायद्याचे (FCRA) समर्थन केले.

हेही वाचा

८०० कोटींहून अधिक कमाई करणारा ‘जेलर २’ आता ओटीटीवर! जाणून घ्या कुठे आणि कधी पाहाल?


केंद्रीय मंत्र्यांच्या आरोपांवर CJP ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर (ट्विटर) पोस्ट करत भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींच्या विश्वासाहर्तेवरच बोट ठेवले. “ही अत्यंत लाजीरवाणी आणि संतापजनक बाब आहे. एक केंद्रीय मंत्री कोणत्याही पुराव्याशिवाय काहीही बिनबुडाचे आरोप करून सहज मोकळे होतात. अशा बेजबाबदार विधानांमुळेच आज घटनात्मक आणि उच्च पदांवर बसलेल्या व्यक्तींच्या शब्दांना कोणतेही मूल्य उरलेले नाही,” अशी खरमरीत टीका CJP ने केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group