ताज्या घडामोडीपुणे

फिडेल सॉफ्टटेक ने केली सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा

फिडेलचा जागतिक विस्तार अधिक सक्षम होणार

पुणे | जपान मध्ये टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि लँग्वेज सोल्युशन्स क्षेत्रात नामांकित असलेल्या फिडेल सॉफ्टटेक लि. कंपनीने आज सॉफ्टेंजर आणि तिच्या ग्रुप कंपन्यांच्या धोरणात्मक अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची घोषणा केली.

सॉफ्टेंजर ही भारत, सिंगापूर, मलेशिया आणि यूएईमध्ये कार्यरत २०० कोटी रुपयांचा महसूल असलेली एक प्रस्थापित आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, सायबर सिक्युरिटी, डेटा सेंटर सपोर्ट आणि मॅनेज्ड सर्व्हिसेस कंपनी आहे. हे नियोजित अधिग्रहण फिडेल च्या विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे तिचा ग्राहकवर्ग, वितरण क्षमता आणि आशियातील भौगोलिक क्षमता, प्रस्थापित ग्राहक संबंध, अनुभवी आयटी व्यावसायिकांचा मोठा समूह आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, एंटरप्राइझ सपोर्ट व मॅनेज्ड सर्व्हिसेस मधील क्षमतेमध्ये मोठी वाढ होईल. तसेच क्रॉस सेलिंग, कार्यान्वयन समन्वय आणि व्यवस्थापित सेवांमध्ये एआय चलित ऑटोमेशन चा अवलंब करण्याच्या अधिक व्यापक संधी निर्माण होतील. तसेच आगामी काळात या अधिग्रहणाची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फिडेल आपले जपानच्या प्रस्थापित उद्योग जगतातील अस्तित्व, बहुभाषिक क्षमता आणि डिजिटल परिवर्तन कौशल्य यांना सॉफ्टेंजर च्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापित सेवांच्या सामर्थ्यासह जागतिक स्तरावर एकात्मिक तंत्रज्ञान सेवा समूह म्हणून आपले स्थान अधिक सक्षम करेल.

 

हेही वाचा

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक ऍक्रोबॅटिक स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे यश

“सॉफ्टेंजर आणि तिच्या समूह कंपन्यांचे नियोजित अधिग्रहण हे फिडेलच्या विकासाच्या टप्प्यातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. गेल्या काही वर्षांपासून, आम्ही नैसर्गिक वाढ आणि धोरणात्मक अधिग्रहण द्वारे आमच्या क्षमता सातत्याने वाढवत आहोत. आता सॉफ्टेंजर च्या होणाऱ्या अधिग्रहण मुळे आम्हाला विस्तारीत कार्यक्षेत्र, अनुभवी प्रशिक्षित टीम आणि अनेक बाजारपेठा मध्ये प्रस्थापित ग्राहक संबंध स्थापित करता येतील. आता फिडेल च्या जपान मधील कौशल्य, डिजिटल परिवर्तन क्षमता आणि एआय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी संधी उपलब्ध होतील. तसेच या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक मोठी, वैविध्यपूर्ण आणि जागतिक स्तरावर एकात्मिक तंत्रज्ञान सेवा संस्था उभारणे हे आमचे ध्येय आहे. यामुळे आम्हाला पुढील काही वर्षांत महसूल वाढीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच शाश्वत वाढ, कार्यात्मक कार्यक्षमता आणि दीर्घकालीन मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यास आणखी व्यापक संधी मध्ये वाढ होईल.”

फिडेल सॉफ्टटेक लि. ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसइ) सूचीबद्ध माहिती तंत्रज्ञान आणि भाषा सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. फिडेल सॉफ्टटेक ने आर्थिक वर्ष २०२५-२६ कंपनीने सलग चौथ्या वर्षी भाग धारकासाठी २२.५ टक्के लाभांश जाहीर केला आहे. ही कंपनी जपान, भारत आणि युनायटेड स्टेट्स मध्ये कार्यरत आहे. जागतिक ग्राहकांना आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅनेज्ड सर्व्हिसेस, एंटरप्राइझ सोल्यूशन्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, एआय आणि डेटा ॲनालिटिक्स, लोकलायझेशन आणि बहुभाषिक स्टाफिंग सोल्यूशन्स या सेवा प्रदान करते अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी दिली.

कंपनीच्या www.fidelsoftech.com या वेबसाइट विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

सॉफ्टेंजर कंपनी बद्दल..

सॉफ्टेंजर ही एक आयटी सेवा कंपनी असून, तिचे कामकाज भारत, सिंगापूर, मलेशिया आणि यूएईमध्ये चालते. ही कंपनी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी, डेटा सेंटर सपोर्ट, एंटरप्राइझ टेक्नॉलॉजी सपोर्ट आणि मॅनेज्ड सर्व्हिसेस मध्ये विशेषज्ञ आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group