ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

झांबिया शिष्टमंडळाची पिंपरी चिंचवड विद्यापीठाला भेट

पिंपरी, पुणे :  भारत आणि झांबिया यांच्यातील उच्च शिक्षण, संशोधन क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे आवश्यक आहे. भविष्यातील शैक्षणिक भागीदारीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी झांबिया च्या शिष्टमंडळाने पीसीयू मध्ये दिलेली सदिच्छा भेट ही उपयोगी ठरेल असे पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य दिवस यानिमित्ताने झांबिया सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली.

यावेळी क्रेडिटस अँड स्कॉलर शिप्स उपसंचालक डेरिक चिसांगा, क्रेडिट्स अँड स्कॉलरशिप्स व्यवस्थापक फ्लेमिंग मुकोशा, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर, संशोधन व विकास संचालक डॉ. भरत काळे, केनया येथील मार्केटिंग मॅनेजर निशा कोटक, आंतरराष्ट्रीय प्रवेश व्यवस्थापक रचना पहुजा, डॉ. रामदास बिरादार आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  दुष्काळी मदतीच्या वाटपात बार्शीची आघाडी; शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात

पीसीयू कुलपती तथा पीसीईटी विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

या भेटी दरम्यान आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारी विकसित करणे, विद्यार्थी व प्राध्यापक आंतरराष्ट्रीय देवाण घेवाण प्रोत्साहन देणे, दोन्ही देशांतील शैक्षणिक संधींचा विस्तार करणे, भारत आणि झांबिया यांच्यात दीर्घकालीन संस्थात्मक सहकार्य विकसित करण्यासाठी भविष्यात सामंजस्य करार करणे याविषयी झाली.

अशा प्रकारच्या भागीदारी मुळे विद्यार्थ्यांना जागतिक अनुभव मिळू शकतो, प्राध्यापकांना आपले ज्ञान व कौशल्य सामायिक करता येते आणि शैक्षणिक संस्थांना संयुक्त संशोधन व नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी नवीन दिशा मिळू शकते. ही भेट भारत आणि झांबिया यांच्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक आशादायी पाऊल आहे. सातत्यपूर्ण संवाद आणि परस्पर हिताच्या उपक्रमांच्या माध्यमातून ज्ञानाला सीमांच्या पलीकडे नेणारी आणि प्रत्येक संवादातून नव्या शक्यता निर्माण करणारी जागतिक शैक्षणिक व्यवस्था घडविण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button