Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘गाय ही जगाची माता’; गुजरातमधील गोहत्या प्रकरणात तिघांना जन्मठेप, प्रत्येकी तीन लाखांचा दंड

अहमदाबाद | गुजरातमधील एका गोहत्या प्रकरणात गांधीनगर जिल्ह्यातील न्यायालयाने अहमदाबादमधील तीन आरोपींना जन्मठेपेची अद्दल घडवणारी शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने मनुस्मृती, वेद आणि हिंदू धर्मग्रंथांचे दाखले देत गायीला ‘जगाची माता’ (जगन्माता) असे संबोधले. कलोल न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ब्रिजेशकुमारी रामेश्वर सिंह राजपूत यांनी २६ ऑक्टोबर रोजी हा ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने तिन्ही दोषींना जन्मठेपेसह प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

वसीम कुरेशी (३४), मोहम्मद रफीक कुरेशी (२४) आणि अशफाक बेहलिम (१९) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २२ ऑगस्ट २०२४ रोजी पोलिसांनी कलोल तालुक्यातील जमला गावातील धनकणी वास परिसरातील एका घरावर छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान आरोपींकडून २७७ किलो मांस, जनावरांच्या कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि मांस वाहून नेण्यासाठीचे वाहन जप्त करण्यात आले होते. फॉरेन्सिक तपासणीत ते मांस गोमांस असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी कलोल तालुका पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता; त्यापैकी ललबाई सेनमा यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता.

हेही वाचा

IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय! ४ नव्या प्रशिक्षकांची घोषणा, पोलार्डच्या टीममध्ये दिग्गजांचा समावेश

न्यायालयाच्या आदेशात वेद आणि मनुस्मृतीचे संदर्भ

न्यायालयाने आपल्या आदेशाची सुरुवात एका संस्कृत श्लोकाने केली. गोरक्षण हे केवळ धार्मिक कर्तव्य नसून करुणा आणि संवेदनशीलतेशी निगडित आहे, त्यामुळे गोहत्येसारख्या गुन्ह्यात कडक कारवाई झालीच पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले.

“गाय ही जगाची माता मानली जाते. तिच्या शरीरात ३३ कोटी देवतांचे वास्तव्य असल्याची कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. गायीचे चार पाय हे चार वेदांचे प्रतीक आहेत,” असे महत्त्वपूर्ण आणि भावनिक निरीक्षण न्यायालयाने निकालपत्रात नोंदवले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button