TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

उद्धव-राज ठाकरेंसोबतच्या चर्चेचा फडणवीसांनी केला खुलासा; म्हणाले, राजकीय चर्चा झालीच नाही!

व्यंगचित्रकारांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात तिन्ही नेते एकत्र; बंद दाराआड बैठकीच्या चर्चांना मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण, महाराष्ट्रात ५० हजार इलेक्ट्रिक बसेसची गरज असल्याचेही सांगितले

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिघेही एका व्यंगचित्रकारांच्या कार्यक्रमात एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या कार्यक्रमादरम्यान तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून, आपण तिघेही साहित्यप्रेमी म्हणून उपस्थित राहिलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, “अतिशय छान कार्यक्रम होता. ‘हास्यरेषा’ हे व्यंगचित्रकारांवरील पुस्तक होते. आम्ही तिघेही साहित्यप्रेमी म्हणून तिथे गेलो होतो. कार्यक्रमातील भाषणे हास्यविनोदाने भरलेली होती. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. राजकीयदृष्ट्या अशा कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र येऊ शकतो. याला कोणताही राजकीय अर्थ नाही.”

तसेच, बंद खोलीत कोणतीही राजकीय बैठक झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “व्यंगचित्रकारांसह आम्ही त्या खोलीत बसलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. याचे वेगळे अन्वयार्थ कोणीही काढू नयेत,” असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात ५० हजार इलेक्ट्रिक बसेसची गरज

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग आणि इलेक्ट्रिक बसच्या गरजेबाबतही भूमिका मांडली. प्रदूषणमुक्त भारतासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आगामी तीन ते चार वर्षांत सुमारे ५० हजार इलेक्ट्रिक बसेसची गरज भासणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. पुणे आणि नागपूर महानगरपालिकांनाही इलेक्ट्रिक बसेसची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ही मागणी पूर्ण करण्यासाठी पिनॅकलच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  वाकडमध्ये हृदयद्रावक घटना ! 18 व्या मजल्यावरून मारली उडी,महिला आणि सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे केंद्र बनणार

फडणवीस म्हणाले की, पुणे हे आधीपासूनच ऑटोमोबाइल उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र आहे. आता चाकणमध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीलाही चालना मिळत आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या वाढीसाठी विविध योजना आखल्या असून, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे केंद्र बनत आहे.

२०१५ मध्ये पुण्यात पीएमपीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता राज्यात पुढील तीन ते चार वर्षांत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेसची आवश्यकता असेल. त्यामुळे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ईव्ही उद्योगामुळे रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात महाराष्ट्राला मोठी संधी असल्याचे सांगताना फडणवीस यांनी या उद्योगामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. या उद्योगात महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील सध्याची सहा उत्पादन युनिट्स भविष्यात ६० पर्यंत पोहोचतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता महाराष्ट्र या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही ते म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button