TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडमध्ये हृदयद्रावक घटना ! 18 व्या मजल्यावरून मारली उडी,महिला आणि सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

सिग्नेचर पार्क सोसायटीतील दुर्दैवी घटना; घटनास्थळी तीन पानी चिठ्ठी मिळाल्याची माहिती, आजारपणाचा उल्लेख असल्याचा प्राथमिक अंदाज

पिंपरी-चिंचवड : वाकड परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये एका महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकता भांगड आणि त्यांचा मुलगा माधव भांगड अशी मृतांची नावे आहेत.  तिथल्या 18 व्या मजल्यावरून तिने मुलासह खाली उडी मारत आयुष्य संपवलं.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाकड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकता भांगड या पती मनोज भांगड आणि मुलगा माधव यांच्यासह वाकड येथील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये राहत होत्या. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून आवश्यक तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्रातील मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० नोव्हेंबरला; निवडणूक आयोगाकडून SIR वेळापत्रकात बदल

घटनास्थळी तीन पानी चिठ्ठी मिळाल्याची माहिती

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी तीन पानी चिठ्ठी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीत महिलेने आपल्या आजारपणाचा आणि मुलाच्या भविष्याबाबत वाटणाऱ्या चिंतेचा उल्लेख केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

मात्र, या चिठ्ठीतील मजकूर, घटनेमागील नेमकी कारणे आणि इतर परिस्थिती याबाबत पोलिसांकडून अधिकृत तपास सुरू आहे. त्यामुळे सध्या समोर आलेल्या माहितीकडे प्राथमिक माहिती म्हणूनच पाहणे आवश्यक आहे.

वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, तपासातून अधिकृत माहिती समोर आल्यानंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button